PM Modi Brunei Visit: ब्रुनेईला पोहोचून पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, असा आहे त्यांचा संपूर्ण प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:59 PM2024-09-03T13:59:29+5:302024-09-03T14:00:00+5:30
PM Narendra Modi Brunei Visit: ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची...
पंतप्रधाननरेंद्र मोदी आज ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून ते ब्रुनेई दारुस्सलाम येथे जात आहेत. महत्वाचे म्हणजे, ब्रुनेई द्विपक्षीय दौऱ्यावर जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची. कारण येथे अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
पंतप्रदान मोदींचा संपूर्ण स्केड्यूल -
- 3 सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी ब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तेथे त्यांचे औपचारीक स्वागत केले जाईल.
- सायंकाली 5:30 वाजता ते ठरलेल्या हॉटेलवर पोहोचतील. तेथे त्यांचे सामुदायिक स्वागत केले जाईल.
- सायंकाळी 7:50 वाजता भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सरीचे उद्घाटन करतील.
- रात्री 08:15 वाजता पीएम मोदी उमर अली सैफुद्दीन मशिदीचा दौरा करतील.
या मुद्द्यांवर होणार चर्चा -
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेई दौऱ्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामुळेच त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सेमीकंडक्टर सहकार्य -
पंतप्रधान मोदी तेथील सुल्तानांसोबत बोलताना सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील.
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक -
भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात 270 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीसंदर्भात तेथील सुलतानांसोबत चर्चा करतील.
हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायूची आयात -
भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करतो. सध्या भारत नैसर्गिक वायूची आयात वाढविण्यावर भर देत आहे. अशात पंतप्रधान मोदी या विषयावरही विशेष चर्चा करू शकतात, असे मानले जात आहे.
म्यानमारच्या परिस्थितीवर चर्चा -
पीएम मोदी सुल्तान हसनल बोल्किया यांच्यासोबत म्यानमारच्या स्थितीवरही चर्चा करू शकतात.