पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:40 AM2024-01-22T08:40:18+5:302024-01-22T08:40:27+5:30

दक्षिणेतील रामदर्शन केले पूर्ण

PM Modi completes spiritual journey; Obeisance was done at the place where Ram Setu was built | पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

रामेश्वरम (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अरिचल मुनईजवळील प्रभू राम मंदिरात पूजा केली. दक्षिण भारतातील रामायणाशी संबंधित मंदिरांचा आध्यात्मिक प्रवास त्यांनी पूर्ण केला. धनुषकोडीजवळील मंदिरात त्यांनी प्रार्थना केली आणि समुद्रकिनारी पुष्पांजली अर्पण केली.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी मंदिरांना भेटी पूर्ण झाल्याबद्दल, मोदींनी धनुषकोडी आणि अरिचल मुनईच्या मार्गावर असलेल्या श्री कोठंडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. येथून श्रीलंका हाकेच्या अंतरावर आहे. तामिळ भाषेत कोठंडारामस्वामी म्हणजे भगवान राम आणि धनुष्यबाण सूचित करतात. पंतप्रधानांनी अरिचल मुनई समुद्र किनाऱ्यावर आणि राष्ट्रीय चिन्ह असलेल्या स्तंभावर पुष्पांजली वाहिली. 

रामसेतू बांधला तेथे भेट 
पंतप्रधानांनी समुद्र किनाऱ्यावर ‘प्राणायाम’ केला आणि समुद्राच्या पाण्याचा वापर करून प्रार्थना केली. आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी आंध्र प्रदेश आणि केरळमधील मंदिरांमध्ये प्रार्थना केली. शनिवारी रात्री रामेश्वरम येथे मुक्काम केलेले मोदींनी अरिचल मुनई येथे राम सेतू बांधला गेला, त्याठिकाणी नतमस्तक झाले.

पवित्र पाण्याचे ‘कलश’ घेऊन माघारी
कोठंडारामस्वामी मंदिर आणि अरिचल मुनईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मदुराईला पोहोचले आणि विमानाने नवी दिल्लीला गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की, मोदी आपल्यासोबत तामिळनाडूतील पवित्र पाण्याचे ‘कलश’ घेऊन गेले आहेत.

Web Title: PM Modi completes spiritual journey; Obeisance was done at the place where Ram Setu was built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.