नरेंद्र मोदी लोकसभेचा निकाल जाहीर करणार; ओमर अब्दुल्लांचं मजेशीर ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:18 PM2019-03-27T12:18:58+5:302019-03-27T12:21:22+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी साधणार देशवासीयांशी संवाद

pm modi is declaring the results of Lok Sabha elections tweets omar abdullah | नरेंद्र मोदी लोकसभेचा निकाल जाहीर करणार; ओमर अब्दुल्लांचं मजेशीर ट्विट

नरेंद्र मोदी लोकसभेचा निकाल जाहीर करणार; ओमर अब्दुल्लांचं मजेशीर ट्विट

Next

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी मोदी नेमक्या काय घोषणा करणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी एक मजेशीर ट्विट केलं आहे. 


 

नरेंद्र मोदी लोकसभेचा निकाल जाहीर करणार असल्याचं अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं. अब्दुल्ला यांच्यासोबतच ट्विटरवर अनेकांनी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मोदींनी ट्विटमध्ये 'मेरे प्यारे देशवासीयों' असे शब्द वापरल्यानं अनेकांना नोटाबंदीची आठवण झाली. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या नोटा बंद होणार, असा प्रश्न काहींनी गमतीनं उपस्थित केला आहे. 

Web Title: pm modi is declaring the results of Lok Sabha elections tweets omar abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.