8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:14 PM2020-01-02T17:14:58+5:302020-01-02T17:25:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

pm modi distributes krishi karman awards in tumkur karnataka farmer | 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी

8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी

Next

तुमकूर(कर्नाटक)- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्मण अवॉर्ड दिले आहेत. आज 8 कोटी शेतकऱ्यांजवळ सन्मान निधी पोहोचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचं दर्शन झालं, हे माझं भाग्य आहे. 130 कोटी देशवासीयांच्या वतीनं भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला नववर्षांच्या शुभेच्छा देतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. कृषी कर्मण पुरस्काराबरोबरच आज कर्नाटकाच्या धरतीवर आणखी एका इतिहासाची नोंद झाली आहे. या कार्यक्रमातच फक्त देशातील 6 कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
  
देशात एक असा काळ होता ज्यावेळी गरिबांना 1 रुपया पाठवल्यावर फक्त 15 पैसे पोहोचत होते. इतर 85 पैसे मधलेच खात होते. आज जेवढे पैसे आपण पाठवतो आहोत, ते पूर्णतः शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहेत.


दशकांपासून धूळखात पडलेल्या सिंचन योजना सुरू झाल्या असून, शेतीच्या विम्याशी निगडीत नियमांतही बदल करण्यात आलेला आहे. सॉइल हेल्थ कार्ड असो किंवा युरियाचं नीम कोटिंगमध्ये आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे, असंसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ केला. तसेच कर्नाटकला कृषी कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळाला असून, एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

 

Web Title: pm modi distributes krishi karman awards in tumkur karnataka farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.