पीएम मोदींनी दिली 'कॉन्सर्ट इकोनॉमी'ची कॉन्सेप्ट...; कोल्डप्लेचा उल्लेख करत म्हणाले जबरदस्त स्कोप...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:05 IST2025-01-28T15:04:03+5:302025-01-28T15:05:19+5:30
मोदी म्हणाले, "आपण गेल्या काही दिवसांत मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील. यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे, हे लक्षात येऊ शकते...

पीएम मोदींनी दिली 'कॉन्सर्ट इकोनॉमी'ची कॉन्सेप्ट...; कोल्डप्लेचा उल्लेख करत म्हणाले जबरदस्त स्कोप...!
भारतात लाईव्ह कॉन्सर्टसाठी प्रचंड स्कोप आहे. हे क्षेत्र भारतात झपाट्याने वाढत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि अहमदाबादेत होणाऱ्या ब्रिटिश बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसंदर्भात बोलोताना म्हटले आहे.
हा देश कॉन्सर्टचा मोठा ग्राहक -
मोदी म्हणाले, "आपण गेल्या काही दिवसांत मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील. यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे, हे लक्षात येऊ शकते. आज भारतात कॉन्सर्ट इकॉनॉमी क्षेत्र देखील वाढत आहे. हा देश कॉन्सर्टचा (संगीत कार्यक्रमांचा) मोठा ग्राहक आहे.
जगभरातील मोठ-मोठ्या कलाकारांचीही भारतात येण्याची इच्छा -
पंतप्रधान मोदी भुवनेश्वर येथे उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025 ला संबोधित करताना म्हणाले, "आपल्याला आशा आहे की, कॉन्सर्ट इकोनॉमी सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारे आणि खासगी सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करेल. आजकाल तर जगभरातील मोठ-मोठ्या कलाकारांचीही भारतात येण्याची इच्छा असते.
#WATCH | Bhubaneswar | At Utkarsh Odisha – Make in Odisha Conclave 2025, PM Narendra Modi says, "You must have seen fabulous pictures of Coldplay concert organised in Mumbai and Ahmedabad. It shows that India has a massive scope for live concerts. Big artists from around the… pic.twitter.com/Gw9UMZ8EV2
— ANI (@ANI) January 28, 2025
गेल्या १० वर्षांत लाईव्ह इव्हेंट्स आणि कॉन्सर्टचा ट्रेंड वाढला -
मोदी पुढे म्हणाले, "या देशाला संगीत, नृत्य आणि कथाकथनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे. येथे कॉन्सर्ट इकोनॉमीला प्रचंड संधी आहे. गेल्या १० वर्षांत लाईव्ह इव्हेंट्स आणि कॉन्सर्टचा ट्रेंड वाढला आहे."
दरम्यान, कोल्डप्ले बँडच्या फ्रंटमन ख्रिस मार्टिन याने हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधला. शाहरुख खान आणि जसप्रीत बुमराहदेखील अहमदाबादच्या शोमध्ये उपस्थित होते.