महात्मा गांधी, नेहरू यांनाही तुम्ही याच तुरुंगात ठेवले होते, विजय माल्यावरून मोदींचे इंग्लंडला खरमरीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 09:26 AM2018-05-29T09:26:17+5:302018-05-29T09:28:14+5:30
बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेजा मे यांना खरमरीत उत्तर दिले
नवी दिल्ली - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेजा मे यांना खरमरीत उत्तर दिले होते. माल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना भारतातील तुरुंगांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला मोदींनी टेरेसा मे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान प्रत्युत्तर दिले. हे तेच तुरुंग आहेत ज्यामध्ये तुम्ही महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांना ठेववे होते, असे मोदी म्हणाले होते.
#WATCH EAM Sushma Swaraj responding to a question on extradition of Vijay Mallya says 'PM Modi told British PM Theresa May that UK courts asking about the condition of Indian jails is not right, as these are the same prisons where they had jailed our leaders like Gandhi and Nehru pic.twitter.com/nLefxOVfY3
— ANI (@ANI) May 28, 2018
ही माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती समोर आणली आहे. मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीमधील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज म्हणाल्या,"नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल परिषदेमध्ये मोदी आणि टेरेजा मे यांची भेट झाली होती. त्या भेटीदरम्यान, मोदी म्हणाले होते की, भारतातील गुन्हेगार लोक इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांच्या प्रत्यार्पणास खूप उशीर होतो. माल्याच्या खटल्यात इंग्लंडच्या न्यायालयाने विजय माल्याचे प्रत्यार्पण करण्यापूर्वी आम्ही भारतातील तुरुंग पाहणार असल्याचे म्हटले होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तेच तुरुंग आहेत. जिथे तुम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा मोठमोठ्या नेत्यांना ठेवले होते. त्यामुळे या तुरुंगांवर तुमच्या न्यायालयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य होणार नाही."काही दिवसांपूर्वी माल्या प्रकरणाची सुनावणी करताना भारतातील तुरुंगांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच माल्याच्या प्रत्यापर्णापूर्वी भारतातील तुरुंगांच्या स्थितीचा तपास करणार असल्याचे सांगितले होते.
तसेच माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या, विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही ब्रिटनला विनंती केली आहे. तसेच 12 बँकांच्या गटाने माल्याविरोधातील खटलाही जिंकला आहे. तसेच बँका आपल्या पैशांची वसुली करू शकतात, असे कोर्टाने सांगितले आहे.