CoronaVirus: लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदींनी गमछातून दिला खास संदेश; तुम्हाला समजला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:56 IST2020-04-14T13:55:18+5:302020-04-14T13:56:20+5:30
coronavirus कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मोदींचा खास संदेश

CoronaVirus: लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदींनी गमछातून दिला खास संदेश; तुम्हाला समजला का?
नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील असं पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित करताना जाहीर केलं. मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना सुरुवातीला तोंडाला गमछा बांधला होता. मात्र थोड्याच वेळात त्यांनी तो बाजूला केला. कोरोनाला रोखण्यासाठी घरातील गमछा, रुमाल यांचा मास्कसारखा वापर करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला.
मोदींनी ११ एप्रिलला देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळीही त्यांना घरातच तयार करण्यात आलेला मास्क वापरला होता. देशातल्या जनतेनं घरातच मास्क तयार करून त्याचा वापर करावा, हा संदेश देण्यासाठी मोदी वारंवार घरातच तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करतात. गमछा, रुमाल, ओढणीचा वापर मास्क म्हणून करता येऊ शकतो, हा संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे.
सध्या देशात मास्क आणि सॅनिटायझर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मोदी घरातच तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत. मास्क मिळत नसल्यानं काही जण मास्क न लावताच घराबाहेर पडतात. अशा व्यक्तींनी घरातील वस्तूंचा वापर करून मास्क तयार करावा, असं मोदींनी त्यांच्या कृतीतून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.