PM Modi Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये २१ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन आणि पायाभरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:52 PM2022-06-18T15:52:27+5:302022-06-18T15:53:48+5:30
मला माझ्या ज्येष्ठांना आणि मातांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचो, असे म्हणत मोदी झाले भावूक
“जेव्हा मी येथून जात होतो, तेव्हा मला माझ्या ज्येष्ठांना आणि मातांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचो. एकविसाव्या शतकातील विकासासाठी भगिनी आणि माता यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आज लष्करापासून ते उद्योगांपर्यंत महिलांसाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यांचे जीवन सोपे होते. त्यांना संधी देण्यास आमचे प्राधान्य आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बेडोदा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले होते. त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
“मला पावागडमध्ये देवीच्या भक्तांसाठी आधुनिक सुविधा देण्याची संधी मिळाली. देशवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी मी देवीकडे प्रार्थना केली आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळात सुवर्ण भारताचा संकल्प पूर्ण होवो यासाठी आशीर्वाद मागितले,” असे मोदी यावेळी म्हणाले. आज मातृवंदनेचा दिवस आहे आणि मी सकाळी माझ्या आईचेही आशीर्वाद घेतले असे त्यांनी सांगितले.
Gujarat | Prime Minister Narendra Modi lays the foundation stone of various developmental projects worth Rs 21,000 crores in Vadodara pic.twitter.com/nbnwXq3jl3
— ANI (@ANI) June 18, 2022
“महिलांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्याला लक्षात घेऊन आम्ही अनेक नवीन योजना केल्या आहेत. महिलांचे जीवन आरामदायी करणे, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करणे, त्यांना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक संधी देणे याला आमच्या सरकारचं प्राधान्य आहे. महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण हे २१ व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi arrives at the venue in Vadodara where he will lay the foundation stone of development projects worth Rs 21,000 crores. CM Bhupendra Patel also present with him.
(Source: DD) pic.twitter.com/sv8SyvkDZb— ANI (@ANI) June 18, 2022
गरजा लक्षात घेऊन योजना
आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना बनवत आहे, निर्णय घेत आहे. यातील बहुतांश प्रकल्प हे आपल्या बहिणी आणि मुलींच्या आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाशी संबंधित आहेत. आज लाखो माता-भगिनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्या आहेत. मला आनंद आहे की आज बडोदा येथून सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या पायाभरणी करण्यात आली. हे प्रकल्प गुजरातच्या विकासापासून भारताच्या विकासाची बांधिलकी मजबूत करणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत गुजरातमधील शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्याचे अभूतपूर्व काम झाले आहे. आतापर्यंत मंजूर १०.५० लाख घरांपैकी सुमारे ७.५० लाख घरे शहरी गरीब कुटुंबांना देण्यात आली आहेत. आमच्या डबल इंजिन सरकारने गेल्या ८ वर्षांत महिलांना सक्षम केले आहे. भारताच्या विकासासाठी त्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आज लष्करापासून खाणींपर्यंत महिलांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.