कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 09:51 AM2021-06-19T09:51:12+5:302021-06-19T09:54:50+5:30

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday | कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

googlenewsNext

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ जूनला जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहांसह केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.


ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. जम्मू-काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी याला विरोध केला. पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवण्यात आली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

सर्व रेकॉर्ड ब्रेक! कोरोना काळात मोदी सरकारला बंपर लॉटरी; इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून या बैठकीला महत्त्वाचे मंत्री उपस्थित असतील. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. यासोबतच जम्मू-काश्मीरमधील भाजप आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेदेखील बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.

अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्यात आलं. त्यानंतर राज्यातील अनेक पक्षांनी एकत्र येत पीपल्स अलायन्स फॉर गुप्कार डिक्लेरेशन नावानं एक आघाडी तयार केली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा समावेश आहे.

Web Title: PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.