'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:19 PM2023-04-08T14:19:53+5:302023-04-08T14:27:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत.

pm modi hyderabad vande bharat flag off chennai terminal inauguration all updates | 'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी सिकंदराबाद-तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पीएम मोदींनी विरोधकांवर टीका केली. 'तेलंगणाचा विकास आम्ही थांबू देणार नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 'सरकार सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मॉडेलवर काम करत आहे, असं सांगत सर्वाचे आभारही पीएम मोदींनी मानले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्या सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई केली आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही वेगळी नाही. आपल्या भ्रष्टाचाराची फाईल तर उघडली जाणार नाही ना याची या लोकांना भीती वाटते. त्यांना कोर्टाचा धक्काही बसला. भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याची भीती वाटते.

'भ्रष्टाचाराची पुस्तके कोणी उघडू नयेत, अशी सुरक्षा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी अशा अनेक पक्षकारांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही न्यायालयाने त्यांना धक्का दिला, असंही पीएम मोदी म्हणाले.

अदानींवर टीका करणे अयोग्य, असे मी बोललो नाही; शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी केले स्पष्ट

पीएम मोदींनी तेलंगणा सरकारवर हल्लाबोल केला. तेलंगणा राज्य सरकार आम्हाला साथ देत नसल्याने कामाला विलंब होत आहे. हे लोक कुटुंबवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार जोपासत राहिले, जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे तेलंगणा त्रस्त आहे, असा आरोपही पीएम मोदींनी केला. आज केंद्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण योजना विकसित केली आहे. आज शेतकरी, व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवले जातात, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, कोरोनाच्या काळात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते, मात्र भारत पुढे जात आहे. तेलंगणात गेल्या ९ वर्षांत रेल्वे बजेटमध्ये सुमारे १७ पटीने वाढ करण्यात आली आहे. नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम असो किंवा दुहेरीकरणाचे काम असो किंवा इलेक्ट्रिक लाईन बनवण्याचे काम असो. केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण झाले आहे.

देशातील ही १३वी वंदे भारत ट्रेन आहे. आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

प्रोटोकॉलनुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र ते कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. पंतप्रधान आज तेलंगणामध्ये ११,३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

Web Title: pm modi hyderabad vande bharat flag off chennai terminal inauguration all updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.