डीपफेकबाबत पीएम मोदी चिंतेत; G-20 व्हर्च्युल समिटमध्ये जागतिक नेत्यांना केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:07 PM2023-11-22T22:07:10+5:302023-11-22T22:07:44+5:30
PM Modi in G20 Virtual Summit: पीएम नरेंद्र मोदींनी AI तंत्रज्ञानाचे स्वागत केले, पण याच्या चुकीच्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली.
PM Modi Speech In G20 Virtual Summit: G20 व्हर्च्युल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीपफेकसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आज झालेल्या या समिटमध्ये मोदींनी AI तंत्रज्ञानाचे स्वागत केले, पण AIच्या चुकीच्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली. तसेच, याच्या वापरावर निर्बंध आणण्याचे आवाहनही जगभरातील नेत्यांना त्यांनी यावेळी केले आहे.
पीएम मोदी पुढे म्हणाले, आजच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर गरजेचा आहे. डीपफेक समाजासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी किती धोकादायक आहे, याचे गांभीर्य समजून पुढे जावे लागेल. जगभरात AIच्या नकारात्मक वापरामुळे चिंता वाढली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की, AIच्या वैश्विक नियमावलीबाबत आपल्याला मिळून काम करायला हवं.
#WATCH | At the G20 virtual Summit, PM Modi speaks on the deepfake issue, says, "The world is worried about the negative effects of AI. India thinks that we have to work together on the global regulations for AI. Understanding how dangerous deepfake is for society and… pic.twitter.com/YtSIW1qIcN
— ANI (@ANI) November 22, 2023
आमची इच्छा आहे की AI लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पण ते समाजासाठी सुरक्षितही असायला हवं. याच हेतूने भारतात पुढच्या महिन्यात ग्लोबल AI समिट पार्टनरशीपचे आयोजन करण्यात आले आहे. मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण यामध्ये सहभागी व्हाल आणि सहकार्य कराल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.