Somnath Temple: एकीकडे सोमनाथ मंदिराचा घंटानाद, दुसरीकडे समुद्राचा आवाज; मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 01:12 PM2021-08-20T13:12:04+5:302021-08-20T13:12:33+5:30

Narendra modi on Somnath Temple: अहिल्याबाई होळकर आजवर जुन्या सोमनाथ मंदिराच्या नावाने ओळखले जाते. याच्या नुतनीकरणावर 3.5 कोटी रुपये खर्च. एक किमी समुद्र दर्शन पदपथावर 47 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पर्यटक सुविधा केंद्राजवळ सोमनाथ प्रदर्शन केंद्र बनविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गृह मंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी देखील उपस्थित होते. 

PM Modi inaugurate various development projects at Somnath Temple in Gujarat | Somnath Temple: एकीकडे सोमनाथ मंदिराचा घंटानाद, दुसरीकडे समुद्राचा आवाज; मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

Somnath Temple: एकीकडे सोमनाथ मंदिराचा घंटानाद, दुसरीकडे समुद्राचा आवाज; मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

googlenewsNext

गुजरातच्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला (Somnath temple) आज मोठी भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमनाथ मंदिर परिसरात वेगवेगळ्या योजनांची सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदी यांनी सोमनाथ समुद्र दर्शन पदपथ, प्रदर्शन केंद्र, नूतन अहिल्याबाई होळकर मंदिराचे उद्घाटन केले. सोबतच पार्वती मंदिराची कोनशिला ठेवण्यात आली. पार्वती मंदिर पांढऱ्या दगडांमध्ये बांधले जाणार आहे. याची उंची 71 फूट असेल. (PM Modi inaugurate seaside promenade at Somnath temple)

मोदी यांनी अफगानिस्तानातील तालिबानी राजवटीवरही भाष्य केले. श्रावण महिन्यात एक मोठी सुरुवात झाली आहे. आस्थेला दहशतीने संपविता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले. दहशताद अधिक काळ मानवतेला संपवू शकत नाही. तसेच त्याचे अस्तित्व कायमचे असू शकत नाही, असे मोदी म्हणाले. 

जग आजही दहशतवादी विचारांनी त्रस्त आहे. समृद्ध भारताचे सोमनाथ मंदिर प्रतीक आहे. देशाचे मूळ सर्वांची साथ, सर्वांचा विकास यामध्ये आहे, असे मोदी म्हणाले. 

सरदार पटेलांची कामे पुढे नेत आहोत. सोमनाथ मंदिराची भव्यता वाढविण्याचे काम सुरु आहे. धार्मिक पर्यटनातून महसुलात वाढ होईल. यामुळे तरुणांना रोजगारही मिळेल, असे ते म्हणाले. 

अहिल्याबाई होळकर आजवर जुन्या सोमनाथ मंदिराच्या नावाने ओळखले जाते. याच्या नुतनीकरणावर 3.5 कोटी रुपये खर्च. एक किमी समुद्र दर्शन पदपथावर 47 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पर्यटक सुविधा केंद्राजवळ सोमनाथ प्रदर्शन केंद्र बनविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गृह मंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी देखील उपस्थित होते. 
 

Web Title: PM Modi inaugurate various development projects at Somnath Temple in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.