Heeraben Modi Death :आई गेल्याचं दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेवून PM मोदी 'ऑन ड्युटी': 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:30 PM2022-12-30T12:30:31+5:302022-12-30T12:37:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. निधनाची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला रवाना झाले.

PM Modi inaugurated & laid the foundation stone for various Railway projects in West Bengal, through video conferencing | Heeraben Modi Death :आई गेल्याचं दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेवून PM मोदी 'ऑन ड्युटी': 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

Heeraben Modi Death :आई गेल्याचं दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेवून PM मोदी 'ऑन ड्युटी': 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. निधनाची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला रवाना झाले. आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी दैनंदिन काम सुरु केले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  पंतप्रधान मोदींनी बंगालमधील हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पश्चिम बंगालमधील वंदे भारत एक्सप्रेससह काही कार्यक्रम नियोजीत होते. पण, आज पहाटे अचानक आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. त्यामुळे मोदी गुजरातसाठी रवाना झाले, त्यामुळे दिवसभरातील मोदींचे नियोजित कार्यक्रम रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण, हे कार्यक्रम रद्द न करता पंतप्रधान मोदी आईला मुखाग्नी देऊन पुन्हा दैनंदिन कामांना सुरुवात केली.  

Heeraben Modi Death: डोळ्यांत अश्रू, मनात दु:ख! नरेंद्र मोदी पुन्हा 'बॅक टू वर्क'; राजभवनाकडे रवाना

आज पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम बंगालमधील हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. हावडा येथील कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. “आदरणीय पंतप्रधान, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा आणि खूप मोठे नुकसान आहे. मी देवाला प्रार्थना करतो, देव तुम्हाला शक्ती देवो. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही पश्चिम बंगालला येणार होता, पण तुमच्या आईच्या निधनामुळे तुम्ही येऊ शकला नाही, पण तरीही सामील झालात. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. आज मला माझ्या आईची आठवण येत आहे. कोणत्या शब्दात व्यक्त करावं तेच कळत नाही. तुमच्या आईच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे, असं  ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना म्हणाल्या. 

78,00 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले.  हावडा ते न्यू जलपाईगुडी जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे. 2,550 कोटींहून अधिक किमतीच्या अनेक सीवर पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आज झाली.  कोलकाता मेट्रोच्या जोका-तरातला पर्पल लाईनचे उद्घाटनही करण्यात आले. 

Web Title: PM Modi inaugurated & laid the foundation stone for various Railway projects in West Bengal, through video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.