दिवाळीनिमित्त PM मोदींनी गरिबांना दिले मोठे गिफ्ट ! अनेकांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 05:38 PM2022-10-22T17:38:37+5:302022-10-22T17:40:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेशमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधलेल्या ४.५ लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या घरांचे उद्घाटन केले आणि त्यांना प्रवेश दिला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेशमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधलेल्या ४.५ लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या घरांचे उद्घाटन केले आणि त्यांना प्रवेश दिला. "या सर्व घरांमध्ये वीज, पाणी कनेक्शन, शौचालय, गॅस कनेक्शन अशा सर्व सुविधा असून यामुळे लाभार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ मिळेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“देशात सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही एक प्रमुख योजना बनली आहे. एक काळ असा होता की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आणि पैसा होता तेच लोक मोटारी, घर यासारखी मोठी आणि महागडी मालमत्ता खरेदी करत असत. मात्र या दिवशी देशातील गरिबांचाही नव्या घरी प्रवेश होत आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.
'हे आपल्या सरकारचे भाग्य आहे की, गेल्या ८ वर्षात 'प्रधानमंत्री आवास योजने' अंतर्गत सुमारे ३.५ कोटी कुटुंबांचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. आमचे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे. सरकार गरिबांच्या इच्छा, मन आणि गरजा सर्वात जास्त समजून घेते आणि त्यांच्यासाठी सतत काम करत आहे, असंही मोदी म्हणाले.
"प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ३० लाख घरे बांधण्यात आली असून, सुमारे ९ ते १० लाख घरे बांधण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याचे मोदी म्हणाले.