पंतप्रधान मोदींच्या हस्ते अब्दुल कलाम स्मारकाचं उद्धाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:43 PM2017-07-27T13:43:09+5:302017-07-27T15:25:34+5:30
अब्दुल कलाम यांचा आज दुसरा स्मृतीदिन असून त्या निमित्ताने रामेश्वरम येथे त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं
रामेश्वरम, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अब्दुल कलाम यांचा आज दुसरा स्मृतीदिन असून त्या निमित्ताने रामेश्वरम येथे त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारलं आहे.
गुरुवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले. ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं, आणि आदरांजली वाहिली. स्मारकाच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास उलगडला गेला असून त्यांच्या आठवणीही जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
Tamil Nadu: PM Modi unveiled a statue of Dr APJ Abdul Kalam and paid tribute to him at the memorial in Rameswaram pic.twitter.com/Lm6Hw8cWCX
— ANI (@ANI_news) July 27, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'कलाम संदेश वाहिनी' बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या बसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ही बस प्रवास करणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी ही बस राष्ट्रपती भवनात पोहोचले. 15 ऑक्टोबर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे.
Tamil Nadu: Prime Minister Narendra Modi inaugurates Dr APJ Abdul Kalam memorial at Pei Karumbu in Rameswaram. pic.twitter.com/RBQLshyeFR
— ANI (@ANI_news) July 27, 2017
भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्यच एक मोठा आदर्श आहे. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.
Tamil Nadu: PM Narendra Modi met family members of Dr APJ Abdul Kalam in Rameswaram pic.twitter.com/fvCpp1hIok
— ANI (@ANI_news) July 27, 2017