PM Modi Interview Live :भाजपा हरून हरूनच जिंकायला लागलीय, डिपॉझीट वाचले म्हणून तेव्हा मिठाई वाटली जायची: नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 08:15 PM2022-02-09T20:15:35+5:302022-02-09T20:15:53+5:30
PM Modi Interview Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं.
"भारतीय जनता पक्ष हा अनेक पराभव स्वीकारूनच जिंकायला लागला आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. डिपॉझिट जप्त होताना पाहिलं आहे. एकदा जनसंघाच्या वेळी निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु त्यावेळी मिठाईदेखील वाटली जात होती. त्यावेळी मिठाई का वाटली जात आहे असा प्रश्न आम्ही केला. त्यावेळी तीन जणांचं डिपॉझिट वाचलं असं आम्हाला उत्तर देण्यात आलं," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Interview) म्हणाले. एनएनआयला (ANI) दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
"जय पराजय दोन्ही आम्ही पाहिला आहे. जेव्हा आम्ही विजयी होतो तेव्हा आपण जमिनीवरच राहावं असे प्रयत्न आम्ही करतो. आम्ही जेव्हा निवडणुका जिंकतो तेव्हा आम्ही लोकांचं हृदय जिंकण्यात कधी कमतरता येऊ देत नाही. आमच्यासाठी प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं हृदय जिंकण्यासाठी आहेत आणि त्यांना समाधान मिळतं तेव्हाच त्यांचं हृदय जिंकलं जातं," असंही ते म्हणाले.
#WATCH भारतीय जनता पार्टी हार-हार कर ही जीतने लगी है। हमने बहुत पराजय देखे हैं, ज़मानत ज़ब्त होती देखी हैं। एक बार जनसंघ के समय चुनाव हारने पर भी मिठाई बांटी जा रही थी, तो हमने पूछा की हारने पर मिठाई क्यों बांट रहे हैं? तब बताया गया कि हमारे तीन लोगों की ज़मानत बच गई: PM मोदी pic.twitter.com/n9oGMokXJt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 9, 2022
यावेळी त्यांनी संसदेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही आपलं मत व्यक्त केलं. "मी कोणाच्याही वडिलांचं, आईचं, आजोबांसाठी काही वक्तव्य केलं नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं ते म्हटलं. एका पंतप्रधानांचे हे विचार होते तेव्हा स्थिती काय होती आणि आजच्या पंतप्रधानांचे हे विचारर आहेत तेव्हा स्थिती काय आहे, हे मी सांगितलं होतं," असंही त्यांनी नमूद केलं.