PM Modi Interview Live : मी मौन बाळगलंय, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहतंय; सुरक्षा त्रुटीवर पंतप्रधानांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:24 PM2022-02-09T21:24:36+5:302022-02-09T21:24:57+5:30
पंजाबमधील फिरोजपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे.
PM Modi Interview Live : पंजाबमधील फिरोजपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली असून ती या प्रकरणाचा तपास करत आहे. एएनआयच्या (ANI) विशेष मुलाखतीदरम्यान या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी पंतप्रधानांना सवाल विचारण्यात आला. "मी या प्रकरणी मौन बाळगलं आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत आहे. माझी कोणतीही भूमिका या तपासावर प्रभाव निर्माण करेल हे बिलकूल योग्य नाही. जे सत्य असेल ते त्या तपासाअंती समोर येईल." असं उत्तर त्यांनी दिलं.
पंजाबमध्ये जेव्हा तुमचा ताफा ब्रिजवर अडकला होता त्यावेळी तुम्हाला काय वाटलं असा प्रश्न पंतप्रधानांना करण्यात आला. "पंजाब आणि माझं जुनं नातं आहे. पक्षाच्या कामाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी बरंच राहिलो आहे. मी त्या ठिकाणच्या लोकांना ओळखतो," असं मोदी म्हणाले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi's interview with ANI’s Smita Prakash https://t.co/QIf9FrKkpo
— ANI (@ANI) February 9, 2022
दहशतवादादरम्यान त्या ठिकाणची परिस्थिती बिकट होती, लोक रात्री घराबाहेर पडू शकत नव्हते. अशातच एकदा कार्यक्रमाला आम्हाला उशीर होत होता. आमची गाडी खराब झाली होती, त्यावेळी दोन शीख बांधव धावत आले. गाडीला धक्काही मारला परंतु गाडी सुरू झाली नाही. तेव्हा त्यांनी मला आणि चालकाला सोबत येण्यास सांगितलं. तसंच आमच्याकडे जेवा आणि तिकडेच रात्री राहण्यास सांगितलं. सकाळी त्यांच्या मुलानं एका मेकॅनिकला बोलावून गाडी ठीक करून दिली. त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीच्या स्वभावाला मी जाणतो," असंही ते म्हणाले.