PM Gati Shakti Yojana: नरेंद्र मोदी उद्या लाँच करणार 'गती शक्ती योजना', देशाला 100 लाख कोटींची मिळणार भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:58 PM2021-10-11T15:58:04+5:302021-10-11T15:59:07+5:30
PM Gati Shakti Yojana: 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल.
PM Gati Shakti Yojana: कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. या अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी, नवीन योजना सातत्याने सुरू केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'गती शक्ती योजने'ची घोषणा केली होती. 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल.
देशाच्या मास्टर प्लॅन आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. 100 लाख कोटी रुपयांच्या या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी चांगल्या करण्यासाठी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल.
15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या योजनेमध्ये रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि वायू, वीज, दूरसंचार, जहाजबांधणी, विमानचालन आणि औद्योगिक पार्क विभागांसह केंद्र सरकारच्या 16 विभागांचा समावेश केला जाईल. केंद्राच्या सर्व 16 विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांचा नेटवर्क नियोजन गट तयार केला जाईल.
पंतप्रधान गती शक्ती योजनेची वैशिष्ट्ये...
- 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गती शक्ती योजनेची घोषणा केली.
- गती शक्ती योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे.
- गती शक्ती योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
- ही योजना पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल.
- स्थानिक निर्मात्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल.
- योजनेअंतर्गत नवीन आर्थिक क्षेत्रेही विकसित केली जातील.
- आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात समग्र दृष्टिकोन स्वीकारला जाईल.
- या योजनेद्वारे संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया घातला जाईल.