देशाचा इतिहास केवळ तो नाही, जो गुलामगिरीच्या मानिसकतेसोबत लिहिणाऱ्यांनी लिहिला : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:07 PM2021-02-16T14:07:53+5:302021-02-16T14:10:38+5:30
PM Narendra Modi Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजन
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव स्वशासी राज्य आरोग्य महाविद्यालय, बहराईचचं लोकर्पणही केलं. यादरम्यान, त्यांनी डिजिटल माध्यमातूल उपस्थितांना संबोधित केलं. "आज मला बहराइचमध्ये महाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य लाभलं आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक ऐतिहासिक चित्तौरा तलावाचा विकास, बहराइचवरील महाराजा सुहेलदेल यांचा आशीर्वाद वाढवेल आणि येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरित करेल," असं मोदी यावेळी म्हणाले.
"भारताचा इतिहास केवळ तोच नाही, जो देशाला गुलाम बनवणाऱ्यांनी, गुलामगिरीच्या मानसिकतेसोबत इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला. भारताचा इतिहास तो आहे जो भारताच्या सामान्य जनतेत, भारताच्या लोकगाथांमध्ये आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. बहराइचसारख्या विकासाच्या महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधांची वाढ केल्यास येथील लोकांचे जीवन सुकर होईल. त्याचे फायदे केवळ श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर या आसपासच्या जिल्ह्यांनाच नाही तर नेपाळहून येणाऱ्या रूग्णांनाही मिळणार असल्याचं ते म्हणाले.
History of India is not just what was written by those who enslaved this country and those with a slave mentality. India's history is that too which the common people of India have kept in the folk stories of India, that which has been carried forward by generations: PM Modi pic.twitter.com/4TrHROZhFc
— ANI (@ANI) February 16, 2021
"देशातील पाचशेपेक्षा अधिक संस्थानांना एकत्र करण्याचं कठिण काम करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेस यांच्यासोबत काय करण्यात आलं याची माहिती देशातील प्रत्येकाला आहे. आज जगातील सर्वात मोठी प्रतीमा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे. जी आम्हाला आजही प्रेरणा देत आहे," असं मोदींनी यावेळी नमूद केलं.
Today when India is entering the 75th year of independence, there can be no bigger an occasion to remember & take inspiration from the contribution of such great men (Maharaja Suheldev), their sacrifice, struggle, valour & martyrdom: PM Narendra Modi https://t.co/yaRXqJtQeW
— ANI (@ANI) February 16, 2021
देशात आज अनेक असे सेनानी आहेत ज्यांचं योगदान अनेक बाबींमुळे मान्य केलं गेलं नाही. चौरी-चौराच्या वीरांसोबत काय झालं, ते आपण विसरू शकतो का? महाराजा सुहेलदेव आणि भारतीयतेच्या रक्षेसाठी त्यांच्या प्रयत्नांबाबतही असंच करण्यात आल्याचंही ते म्हणाले. "गेल्या काही काळापासून देशभरात इतिहास, आस्था, अध्यात्म आणि संस्कृतीशी निगजीत जोडलेल्या स्मारकांच्या निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटनाला चालना देणं हा त्यामागील उद्देश आहे. उत्तर प्रदेश तर पर्यटन, तीर्थक्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये समृद्ध आहे आणि त्याच्या क्षमताही अपार आहेत. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक येत असतात. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही उत्तर प्रदेश पहिल्या तीन राज्यांमध्ये आला आहे," असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.