मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाकडे लक्ष; 'या' मोठ्या घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:47 AM2020-08-14T02:47:32+5:302020-08-14T06:44:33+5:30

नॅशनल हेल्थ कार्डसह रेल्वे आणि संरक्षण विभागाबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

pm modi likely to make big announcements about nhc railway and defence | मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाकडे लक्ष; 'या' मोठ्या घोषणा होणार?

मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाकडे लक्ष; 'या' मोठ्या घोषणा होणार?

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार असून या भाषणाकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. नॅशनल हेल्थ कार्डसह रेल्वे आणि संरक्षण विभागाबाबतच्या सुधारणांविषयी ते मोठ्या घोषणा करु शकतात.

मोदींच्या भाषणात ‘वन नॅशन वन रेशन कार्ड’या योजनेचाही उल्लेख होऊ शकतो. आतापर्यंत या योजनेशी २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जोडले गेले आहेत. आगामी काही महिन्यात लक्षद्विप, लडाख, तामिळनाडू, छत्तीसगड, दिल्ली, मेघालय, पश्चिम बंगाल यांना जोडण्यात येणार आहे.

कोरोना साथीमुळे यंदा परिस्थिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या भाषणात आगामी आव्हानांचाही उल्लेख केला जाऊ शकतो. अर्थव्यवस्थेबाबत ते काय बोलतात याकडे लक्ष लागलेले आहे.

Web Title: pm modi likely to make big announcements about nhc railway and defence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.