PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:02 PM2024-07-28T15:02:50+5:302024-07-28T15:04:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 जुलै) 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागात संबोधित केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा अॅपिसोड होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस (MANAS) या विशेष मोहिमेचा उल्लेख केला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व वयोगटातील भारतीयांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुन्हा एकदा लोकांना तिरंगी ध्वजासोबत सेल्फी घेतलेल्या अभियानाचीही आठवण करून दिली. याच बरोबर, पंतप्रधान मोदी यांनी ड्रग्स विरोधातील लढाईसाठी 'मानस' नावाच्या एका विशेष केंद्राचाही उल्लेख केला.
काय आहे 'मानस' -
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढाईत एक मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी, 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपला मुलगा अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, असे प्रत्येक कुटुंबाला वाटत असते. आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 'मानस' नावाचे एक खास केंद्र सुरू केले आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल आहे. मानस हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे.
कुणाला मिळणार सुविधा? -
यासाठी सरकारने 1933 हा एक टोल फ्री क्रमांक देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून कोणतीही व्यक्ती आवश्यक तो सल्ला घेऊ शकते. तसेच, ड्रग्जशी संबंधित इतर काही माहिती असेल, तर ती या क्रमांकावर कॉल करून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देखील देऊ शकते. येथे सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. पंतप्रधान म्हणाले, भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व सर्व जनतेला, सर्व कुटुंबांना, सर्व संस्थांना माझा आग्रह आहे की, त्यांनी MANAS Helpline चा पुरेपूर उपयोग घ्यावा.