पीएम मोदींची 'जादू' कायम, अप्रूव्हल रेटिंगमध्ये जगातील बड्या-बड्या नेत्यांना टाकलं मागे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:52 PM2023-09-15T17:52:23+5:302023-09-15T17:52:56+5:30
अमेरिकेतील कंसल्टिंग फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' च्या एका सर्व्हेनुसार, हा डाटा 6 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंतचा आहे.
जागतिक पातळीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची जादू अजूनही कायम आहे. ग्लोबल अप्रूव्हल रेटिंगसंदर्भात बोलायचे झाल्यास, पीएम मोदी हे दीर्घकाळापासून जगातील नंबर वन नेते म्हणून कायम आहेत. 76 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेतील कंसल्टिंग फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' च्या एका सर्व्हेनुसार, हा डाटा 6 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंतचा आहे.
या रेटिंगमध्ये 100 टक्के लोकांपैकी 5 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केलेले नाही. तसेच 18 टक्के लोकांनी डिसअप्रूव्हल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे 76 टक्के लोकांची पहिली पसंत म्हणून कायम आहेत. 64 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्विस राष्ट्रपती एलेन बेर्सेट. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर आहेत मॅक्सिकोचे राष्ट्रपती एन्ड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर. त्यांचे रेटिंग 61 टक्के एवढी आहे.
महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन सातव्या आणि ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक 15व्या क्रमांकावर आहेत. जगातील इतर काही बड्या नेत्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डिसल्व्हा, तर पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचा क्रमांक लागतो.
याशिवाया इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या 42 टक्क्यांच्या अप्रूव्हल रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. अहवालानसुसार, हे अप्रूव्हल रेटिंग 6 ते 12 सप्टेंबर, 2023 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित आहे. हे अप्रूव्हल रेटिंग प्रत्येक देशातील अडल्ट लोकांच्या मतदानावर आधारलेले आहे.