एनएसजी सदस्यत्वासाठी पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्या भेटीला, परराष्ट्र सचिवांची सेऊलमध्ये डिप्लोमसी
By admin | Published: June 23, 2016 08:13 AM2016-06-23T08:13:51+5:302016-06-23T08:13:51+5:30
भारताच्या एनएसजी प्रवेशावर निर्णय होणार असल्याने भारताकडून सदस्यत्व मिळवण्यासाठी पडद्यामागून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - एनएसजी देशांची महत्वाची बैठक आजपासून दक्षिणकोरिया सेऊलमध्ये सुरु होत आहे. या बैठकीत भारताच्या एनएसजी प्रवेशावर निर्णय होणार असल्याने भारताकडून सदस्यत्व मिळवण्यासाठी पडद्यामागून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव एस.शंकर सेऊलमध्ये असून, ते विरोधात असलेल्या देशांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आज मोदी उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
एनएसजी प्रवेशामध्ये चीनचा विरोध ही भारताची मुख्य समस्या आहे. एनएसजी सदस्यत्व ही मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची एकप्रकारे कसोटीच आहे. शेवटच्या टप्प्यात फ्रान्सनेही भारताला पाठिंबा देताना अन्य सदस्य देशांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
एनएसजीचे सदस्यत्वाचा निर्णय मतदानाने होत नाही. सर्व सदस्य देशांमध्ये एकमत असेल तरच प्रवेश मिळतो. एनएसजी प्रवेशामुळे आधुनिक अणूऊर्जा तंत्रज्ञान मिळवण्याचा आणि विकण्याचा भारताचा मार्ग मोकळा होईल.