नव्या मित्रासोबत मोदींचा व्हिडिओ, विरोधकांना संकेत तर देत नाहीत ना 'Once मोर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:59 PM2020-08-23T16:59:45+5:302020-08-23T17:03:14+5:30
लॉकडाऊन काळात विरंगुळ्यासाठी प्रत्येकजण काही ना काही डिजिटल उपक्रम राबवत आहे. घरात राहूनच वेळ व्यतीत केला जात आहे. अनेकांनी विविध उपक्रम किंवा ऑनलाईन प्रशिक्षण या काळात शिकून घेतले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीही सध्या लॉकडाऊनमुळे दिल्लीतील निवासस्थानीच आहेत. त्यात, कार्यालयातून किंवा घरातूनच ते फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधतात. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन मोदींनी लॉकडाऊन काळात जनतेशी आपलं नातं जपलं. सातत्याने सोशल मीडियातून जनतेशी संवाद साधत सरकारी निर्णय आणि काळजी घेण्याचं आवाहन मोदींनी केलं. मोदींनी एक व्हिडिओ शेअर करत लॉकडाऊमधील आपल्या आणखी एका मित्राचं दर्शन देशवासियांना घडवलंय.
लॉकडाऊन काळात विरंगुळ्यासाठी प्रत्येकजण काही ना काही डिजिटल उपक्रम राबवत आहे. घरात राहूनच वेळ व्यतीत केला जात आहे. अनेकांनी विविध उपक्रम किंवा ऑनलाईन प्रशिक्षण या काळात शिकून घेतले आहे. पंतप्रधान मोदी हेही नेहमी स्वत:ला कामात व्यस्त ठेवत असतात. मात्र, कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे त्यांना थोडासा आराम मिळाला आहे. याही काळात ते पशू-पक्षांसमवेत आपला वेळ घालवत आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोरांसमवेतचा व्हिडिओ शेअर कला आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर मोदींसमवेत खेळताना, रमताना या व्हिडिओत दिसत आहे.
भोर भयो, बिन शोर,
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2020
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।
रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज। pic.twitter.com/Dm0Ie9bMvF
पंतप्रधान मोदींना बाग बगिचा, प्राणी पक्षी यांची मोठी आवड आहे. यापूर्वीही ते आपल्या पंतप्रधान निवास स्थानातील गार्डनमध्ये योगा करताना दिसून आले होते. आता, मोरसमवेत मोदींचा हा व्हिडिओ त्यांचे पक्षीप्रेम दाखवून देतो. मोदींनी ट्विटर, इंस्टा आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तर, कवि आणि आम आदमी पक्षाचे जुने सहकारी डॉ. कुमार विश्वास यांनी या व्हिडिओच्या माध्यमातूनही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
कुमार विश्वास यांनी मोदींचा हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करत एक कॅप्शन दिलं आहे. त्यामध्ये, विरोधकांना मोदी Once मोर असं तर सांगत नाहीत ना, असा सवाल विश्वास यांनी केला आहे.