PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:33 PM2024-05-14T21:33:35+5:302024-05-14T21:34:31+5:30
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: मोदींनी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला असून त्यात आपल्या संपत्ती आणि शिक्षणाबाबत माहिती दिली आहे.
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील वाराणसीची निवड केली आहे. 2014 मध्ये ते पहिल्यांदा वाराणसीमधून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले. 2019 मध्येही त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली आणि जिंकले. यंदाचा 2024 च्या निवडणुकीच्या लढाईतही ते वाराणसीमधून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. वाराणसीतून निवडणुकीसाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात (Election Affidavit) मोदी यांनी त्यांच्या संपत्तीबाबत आणि शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.
Filed my nomination papers as a candidate for the Varanasi Lok Sabha seat. It is an honour to serve the people of this historic seat. With the blessings of the people, there have been remarkable achievements over the last decade. This pace of work will get even faster in the… pic.twitter.com/QOgELYnnJg
— Narendra Modi (@narendramodi) May 14, 2024
मोदी यांची एकूण संपत्ती किती?
प्रतिज्ञापत्रकानुसार, पंतप्रधान मोदींकडे SBI मध्ये 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची FD आहे. 52 हजार रुपयांची रोकड आहे. याशिवाय SBI मध्ये दोन खाती आहेत. गुजरातच्या गांधीनगरमधील खात्यात 73 हजार 304 रुपये, तर वाराणसीमधील शिवाजी नगर शाखेत 7 हजार रुपये आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये मोदींची 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. जंगम मालमत्तेमध्ये सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्या अंगठ्यांचे वजन 45 ग्रॅम असून किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये इतकी आहे. मुख्य बाब म्हणजे, त्यांच्या नावावर स्वत:चे घर किंवा जमीन नाही. मोदी यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे.
पंतप्रधान मोदींचे शिक्षण-
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मोदी यांनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स केले. पीएम मोदींनी 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स केले.
दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जूनला निकाल जाहीर केला जाणार आहे.