रक्षाबंधनाआधी महिलांना स्पेशल गिफ्ट; पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:49 PM2021-08-12T15:49:06+5:302021-08-12T15:49:36+5:30

महिला स्वयंरोजगार गटांसोबत मोदींचा संवाद; कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक

PM Modi releases financial support to women self help groups | रक्षाबंधनाआधी महिलांना स्पेशल गिफ्ट; पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा

रक्षाबंधनाआधी महिलांना स्पेशल गिफ्ट; पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आत्मनिर्भर नारी शक्ती कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात त्यांनी महिला उद्योजकांसाठी महत्त्वाची घोषणा केली. महिला उद्योजकांना १ हजार ६२५ कोटी रुपयांची रक्कम देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधान मोदींनी आज दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित महिला स्वयंरोजगार गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. 

महिलांमधील उद्योजकांना वाव देण्यासाठी, त्यांच्या उद्योगविश्वाची व्याप्ती वाढवण्यासाठी आज मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात येत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. खाद्यपदार्थांवरील प्रक्रिया असो वा महिला शेतकरी उत्पादक संघ असो किंवा मग दुसरे स्वयंरोजगार समूह, महिलांच्या लाखो गटांना १ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिकची मदत देण्यात आली आहे, असं मोदी म्हणाले.

कोरोना काळात महिलांना स्वयंरोजगार गटांच्या माध्यमातून देशाची सेवा केली. भगिनींनी केलेलं काम अभूतपूर्व असल्याचं गौरवोद्गार मोदींनी काढले. 'माक्स आणि सॅनिटायझर तयार करणं असो वा गरजूंपर्यंत जेवण पोहोचवणं, महिलांनी स्वयंरोजगार गटाच्या माध्यमातून दिलेलं योगदान अतुलनीय आहे. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा कित्येक महिलांकडे बँक खातं नव्हतं. त्या बँकिंग यंत्रणेपासून कोसो मैल दूर होत्या. त्यामुळेच आम्ही जनधन खाती उघडली,' असं मोदींनी सांगितलं.

Web Title: PM Modi releases financial support to women self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.