'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:05 PM2019-05-09T14:05:10+5:302019-05-09T14:15:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे. गुरुवारी (9 मे) पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'मला सांगितलं गेलं की दीदींना मोदींना थप्पड मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही थप्पड मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करीन,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर खोचक टीका केली आहे. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना 'मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते' असंही ममता यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. मोदी पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर म्हणतात, तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी मनात आले की, मोदींनी जोरदार चपराक ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली होती.
#WATCH PM Modi in Purulia, "Mujhe bataya gaya hai ki yahan Didi ne kahan hai ki woh Modi ko thapad maarna chahti hain. Didi' o' Mamata Didi mein toh aapko didi kehta hun, aapka aadar karta hun, aapka thapad bhi mere liye ashirwaad ban jaayega, woh bhi khalunga." pic.twitter.com/DVZ8MxLVCg
— ANI (@ANI) May 9, 2019
'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा
लोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक थांबायचे नाव घेत नाही. मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही. आपण कुणालाही घाबरत नसून निडरतेने जगते. मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत. धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडत असल्याची टीका देखील ममता यांनी मोदींवर केली होती. जय श्री राम हा भाजपचा नारा आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने हा नारा द्यावा. निवडणुका आल्यावर प्रभू रामचंद्र भाजपाचे आणि नरेंद्र मोदींचे एजंट होतात, का असा सवालही ममता यांनी उपस्थित केला होता.
दुश्मनी जमकर करो, लेकिन... सुषमा स्वराज यांचं ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मोदी हे दुर्योधन आणि रावणाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते' असं ममता यांनी म्हटलं होतं. त्याला सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 'तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी जी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करून देते - दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों' असं ट्वीट स्वराज यांनी केलं आहे. तसेच ममता यांना शेर ऐकवत त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ममता जी - आज आपने सारी हदें पार कर दीं. आप प्रदेश की मुख्यमंत्री हैं और मोदी जी देश के प्रधान मंत्री हैं. कल आपको उन्हीं से बात करनी है. इसलिए बशीर बद्र का एक शेर याद दिला रही हूँ :
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 7, 2019
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.