निरपराधांच्या मृत्यूने पंतप्रधान मोदी व्यथित; यूएईचे अध्यक्ष झायेद यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:41 AM2023-11-04T07:41:06+5:302023-11-04T07:41:22+5:30
यूएईचे अध्यक्ष झायेद यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इराण, सौदी अरेबिया, येमेन, सिरिया, जॉर्डन, कतार, इस्रायल, इराक, संयुक्त अरब अमिरातचा समावेश असलेल्या पश्चिम आशियातील स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारी चर्चा केली. पश्चिम आशियात होत असलेल्या दहशतवादी कारवाया, तेथील देशांतील ढासळती परिस्थिती व निरपराध लोकांचे जात असलेले बळी या गोष्टीबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
यासंदर्भात मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युद्धग्रस्त भागातील सुरक्षा, बिघडलेली स्थिती या गोष्टींवर योग्य तोडगा काढण्यात यावा. त्यातून पश्चिम आशियामध्ये शांतता नांदेल असेही त्यांनी सांगितले. भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये सहकार्य वाढविण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोहम्मद बिन झायेद या दोघांनीही सदर संवादात भर दिला.