BREAKING: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार; देशवासीयांशी संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 05:38 PM2020-04-02T17:38:25+5:302020-04-02T17:57:44+5:30

Coronavirus लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदी प्रथमच देशवासीयांशी संवाद साधणार

PM Modi To Share A Video Message With Nation At 9 Am On April 3 amid coronavirus | BREAKING: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार; देशवासीयांशी संवाद साधणार

BREAKING: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार; देशवासीयांशी संवाद साधणार

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. देशात २१ दिवस लॉकडाऊन सुरू असेल, असं मोदींनी जाहीर केलं होतं. यानंतर मोदी प्रथमच देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं मोदी उद्या नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.



उद्या सकाळी ९ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार असल्याचं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेतून त्यांनी ही माहिती दिली आहे. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी आज देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांनी आखलेल्या उपाययोजनांचं, उचलेल्या पावलांचं यावेळी त्यांनी कौतुक केलं. 

देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कल्पना शेअर करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात काय करावं, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याच्या टिप्स मोदी ट्विटरच्या माध्यमातून देत आहेत. लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांना घरीच राहावं लागत आहे. या दिवसांचा सदुपयोग करावा, योगासनं करावीत, अशा काही टिप्स मोदींनी देशवासीयांना दिल्या आहेत. या संदर्भातले काही व्हिडीओदेखील त्यांनी ट्विट केले आहेत.

Web Title: PM Modi To Share A Video Message With Nation At 9 Am On April 3 amid coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.