PM Modi Speech:"यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवं, असं मी गुजरातच्या जनतेला सांगितलं होत"- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:11 PM2022-12-08T20:11:42+5:302022-12-08T20:18:18+5:30
PM Modi Speech: गुजरातमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
Narendra Modi Speech: आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. यात भाजपने गुजरातमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) उपस्थित होते.
गुजरात की जनता ने तो रिकॉर्ड तोड़ने में भी रिकॉर्ड कर दिया।
— BJP (@BJP4India) December 8, 2022
गुजरात के इतिहास का सबसे प्रचंड जनादेश भाजपा को देकर प्रदेश के लोगों ने नया इतिहास बना दिया है।
जाति, वर्ग, समुदाय और हर तरह के विभाजन से ऊपर उठकर भाजपा को वोट दिया है।
- पीएम @narendramodipic.twitter.com/ojXi81r8tk
नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवा
यावेळी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. तसेच निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचेही त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की, "मी जनतेसमोर नतमस्तक आहे. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज आपल्याला मिळाले आहे. जिथे भाजप जिंकू शकला नाही, तिथे आपल्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या लोकांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भुपेंद्रने नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला आहे. यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवा, असं मी जनतेला सांगितलं होतं,'' असं मोदी म्हणाले.
गुजरात के नतीजों ने सिद्ध किया है कि सामान्य मानवी में विकसित भारत के लिए कितनी प्रबल आकांक्षा है।
— BJP (@BJP4India) December 8, 2022
संदेश साफ है कि जब देश के सामने कोई चुनौती होती है तो देश की जनता का भरोसा भाजपा पर होता है।
- पीएम @narendramodipic.twitter.com/mYIkO67rkN
यावेळी हिमाचल प्रदेशच्या निकालांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ''हिमाचलमध्ये इतक्या कमी फरकाने निकाल कधीच आले नाहीत. आमचा 1 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. आम्ही यापुढे हिमाचलच्या हिताचे मुद्दे मांडत राहू. हिमाचलमध्ये सत्तेत आलेल्या पक्षाचे आम्ही अभिनंदन करतो. राज्याच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत, पण विरोधक म्हणून आम्ही योग्य भूमिका पार पाडू.''
संबंधित बातमी- जनतेनं गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश दिला, पंतप्रधानांनी मानले आभार