PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:44 PM2021-02-10T16:44:29+5:302021-02-10T18:39:17+5:30

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी (pm narendra modi) सभागृहासमोर आपले उत्तर देत आहेत. यापूर्वी त्यांनी सोमवारी राज्यसभेत संबोधित करताना कृषी कायद्यांवरही भाष्य केले होते. (pm narendra modi motion of thanks)

PM Modi Speech Lok Sabha LIVE Update pm narendra modi motion of thanks modi reply on president ramnath kovind address | PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीका

PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीका

Next

नवी दिल्ली - लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी (pm narendra modi) सभागृहासमोर आपले उत्तर देत आहेत. यापूर्वी त्यांनी सोमवारी राज्यसभेत संबोधित करताना कृषी कायद्यांवरही भाष्य केले होते. यावेळी त्यांनी MSP होता, MSP आहे आणि भविष्यातही राहीलच असे म्हटले होते. (PM Modi Speech Lok Sabha LIVE Update)

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • यूपीए सरकारच्या काळात देशाच्या सीमेवरील कामांकडे दुर्लक्ष केलं गेलं. आम्ही गेल्या सहा वर्षात खूप काम केलं. अटल टनल हे त्याचं मोठं उदाहरण.
  • देशात सध्या फक्त राजकारणासाठी कृषी कायद्यांना विरोध केला जातोय, हे अतिशय चुकीचं
  • मोदी म्हणाले शेतकरी आंदोलनाला मी पवित्र मानतो. पण आंदोलनजीवींनी ते हायजॅक केले आहे. 




     
  • देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घ्यावे लागतात. सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याचेच निर्णय घेतले आहेत.
  • विरोधक आज विकासाच्या मुद्द्यांवरुन आवाजच उठवत नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 
  • शरद पवारांनीच याआधी ते केंद्रीय कृषीमंत्री असताना कृषी कायदे लागू करण्यासाठीचं वक्तव्य केलं होतं. मग आता विरोध का? मोदींचा सवाल 


     
  • इतके वर्ष सत्तेत असणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सर्व काही माहित होतं, पण देशासाठी विचार केला गेला नाही.
  • पीएम मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उतर देताना काँग्रेसचे वॉकआऊट. मोदी म्हणाले, काँग्रेसना स्वतःचे भले करू शकते ना देशाचे.



  • हे नवे कायदे कुणालाही बंधनकारक नाही, पर्याय आहेत... जिथे पर्याय आहेत, तिथे विरोधाचं काय कारण? आंदोलनजीवी अशा पद्धती वापरतात. भय निर्माण करतात.
  • यांना देशात आगीचा भडका उडवायचा आहे. हा प्रकार फक्त सरकारच्याच नाही, तर देशाच्या चिंतेचा विषय आहे.
  • कायदा लागू झाल्यावर मंडी बंद झाली नाही, एमएसपी बंद झालेली नाही... उलट, एमएसपीची खरेदीही वाढली...
  • या कायद्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न सोची समझी रणनीती...
  • कायद्यांसंदर्भात खोटे पसरवलेय, अफवा पसरवल्यात... त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचलं तर भांडाफोड होईल... म्हणून गोंधळ घातला जातोय...  पण अशाने लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही...
  • कृषी सुधारणेचा सिलसिला आवश्यक, महत्त्वपूर्ण
  • कृषी क्षेत्रापुढील आव्हानं पेलण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.. 
  • कायद्याच्या रंगावर वाद... ब्लॅक आहे की व्हाईट...
  • कंटेन्ट आणि इंटेन्टवर चर्चा केली असती तर बरं झालं असतं... 
     


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर भाष्य करीत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी लोकसभेत गोंधळ केला.
  • शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली असती... 
  • सर्व शेतकरी बांधवांचा सभागृह, सरकार आदर करते, करत राहील
  • सरकारचे वरिष्ठ मंत्री सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत आहेत, सन्मानाने, आदराने करत आहेत...
  • पंजाबमध्ये आंदोलन सुरू होते तेव्हाही चर्चा झालीय...
  • शंका, नेमके मुद्दे काय आहेत, हे शोधण्याचाही प्रयत्न ...
  • शेतकऱ्याचं नुकसान असेल तर बदल करायला काय जातंय.. देशाचं, शेतकऱ्यांचं हितच पाहायचं आहे... अजूनही स्पेसिफिक गोष्ट सांगताहेत का हे पाहतो, ते पटणारे असतील तर बदल करायला कुठलाही संकोच नाही...
     


  • मोदी म्हणाले आपल्या रोमा-रोमात लोकशाही बसलेली आहे. विविधता असूनही आपले लक्ष्य एकच आहे.

  •  
  • कोरोनानंतरच्याजगात आपल्याला जगात एक मजबूत प्लेयरच्या रुपात पुढे यावे लागेल...
  • कोरोना काळात भारताने स्वतःलाच सावरले नाही, तर जगालाही सावरायला मदत केली. 
  • स्वातंत्र्याचे 75वे वर्ष हे अभिमानाचे वर्ष असेल. आपण जगासमोर ठामपणे उभे आहोत.



 

  • बिकट आणि विपरीत परिस्थितीतही हा देश कशा पद्धतीने मार्ग काढतो, हे राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात सांगितले आहे. त्यांचा प्रत्येक शब्द देशवासियांत विश्वास निर्माण करणारा आहे. - मोदी
     

लोकसभेतून नरेंद्र मोदी लाइव्ह -

Web Title: PM Modi Speech Lok Sabha LIVE Update pm narendra modi motion of thanks modi reply on president ramnath kovind address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.