PM मोदींना केले इंप्रेस अन् त्यांच्यासोबत घेतली सेल्फी; कोण आहे हा काश्मिरी तरुण? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:54 PM2024-03-07T15:54:07+5:302024-03-07T15:54:26+5:30
पीएम नरेंद्र मोदी कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.
PM Modi Jammu Kashmir Visit:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सूमारे पाच वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी J&K च्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी राज्यात 6400 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला. तसेच, बक्षी स्टेडियममध्ये विकसित भारताच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या लाभार्थ्याशी बोलत असताना नाझीमने पीएम मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली.
A memorable selfie with my friend Nazim. I was impressed by the good work he’s doing. At the public meeting he requested a selfie and was happy to meet him. My best wishes for his future endeavours. pic.twitter.com/zmAYF57Gbl
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
नाझीमने पीएम मोदींना सेल्फीसाठी विचारले, तेव्हा पंतप्रधानांनी आपल्या एसपीजी टीमला त्या तरुणाला जवळ आणण्यास सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर फोटो शेअर करत पीएम मोदी म्हणाले, “माझा मित्र नाझीमसोबतचा एक संस्मरणीय सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
#WATCH | During 'Viksit Bharat Viksit Jammu Kashmir' program, Prime Minister Narendra Modi interacts with Nazim, a beneficiary of the Viksit Bharat program, at Srinagar's Bakshi Stadium, pic.twitter.com/WogfNv1lqJ
— ANI (@ANI) March 7, 2024
नाझीमच्या बोलण्याने पंतप्रधान इंप्रेस
विकसित भारताचा लाभार्थी नाझीम याने पीएम मोदींसोबत आपल्या कामाचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “मी मधमाशांपासून मध काढण्याचे काम करतो. मी 5 हजार किलो मध विकला आहे. याचा फायदा फक्त मी एकट्याने घेतला नाही, तर माझ्यासोबत इतर तरुणांनाही सामील करून घेतले. हळूहळू जवळपास 100 लोक माझ्या कामात सामील झाले. आम्हाला 2023 मध्ये FPO मिळाला आणि त्यानंतर सर्व चिंता दूर झाल्या. आम्हीही देशासोबत पुढे जात आहोत." हे ऐकून पीएम मोदी खुप इम्प्रेस झाले. त्यामुळे त्यांनी नाझिमसोबतची सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली.
संबंधित बातमी- काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात