'देश जळत असताना पंतप्रधान मोदी कपड्यांविषयी बोलतायेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:07 PM2019-12-18T16:07:48+5:302019-12-18T16:08:08+5:30
कोणत्याही व्यक्तीची राजकीय भूमिका त्याच्या कपड्यांवरून ओळखली जाऊ शकत नाही.
मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत. तसेच हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना, 'देश जळत असताना पंतप्रधान मोदी हे कपड्यांविषयी बोलत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
देशात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकारांच्या बोलण्याकडे लोकं लक्ष देत नसल्याने ते जाळपोळ करत आहे. मात्र आग लावणाऱ्यांची ओळख त्यांच्या कपड्यावरूनच होत असल्याचे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा ममता बॅनर्जी यांनी समाचार घेतला आहे.
कांग्रेस और उसके साथी तूफान खड़ा कर रहे हैं, उनकी बात चलती नहीं है तो आगजनी फैला रहे हैं।
— BJP (@BJP4India) December 15, 2019
ये जो आग लगा रहे हैं, ये कौन है उनके कपड़ों से ही पता चल जाता है: पीएम श्री @narendramodi#JharkhandModikeSaathpic.twitter.com/3YZxddS7g4
कोणत्याही व्यक्तीची राजकीय भूमिका त्याच्या कपड्यांवरून ओळखली जाऊ शकत नाही. तर एकीकडे देश जळत असताना देशाच्या पंतप्रधान हे कपड्यांवर बोलत असल्याचा टोला त्यांनी मोदींना लगवाला. लोकांच्या खाण्याची सवयी किंवा कपडे परिधान करण्याच्या पद्धतीने हिंसा करणारा किवा सामान्य व्यक्ती ओळखला जाऊ शकत नसल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या.