Pm Modi vs Arvind Kejriwal: "गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; पंतप्रधान मोदींची AAP वर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:31 PM2022-10-10T18:31:07+5:302022-10-10T18:31:47+5:30

गुजरातमध्ये सध्या शहरी नक्षलवादी घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचाही लगावला टोला

Pm Modi termed Arvind Kejriwal led AAP Urban Naxal who are trying to destroy youth of Gujarat in Elections  | Pm Modi vs Arvind Kejriwal: "गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; पंतप्रधान मोदींची AAP वर जहरी टीका

Pm Modi vs Arvind Kejriwal: "गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; पंतप्रधान मोदींची AAP वर जहरी टीका

Next

Pm Modi vs Arvind Kejriwal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरात दौऱ्यावर, आम आदमी पक्षावर आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. नरेंद्र मोदी यांनी आपच्या नेतेमंडळींना 'शहरी नक्षलवादी' असे संबोधले. शहरी नक्षलवादी त्यांचे स्वरूप बदलून गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु राज्य त्यांना उद्ध्वस्त करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. गुजरातमधील भरूच जिल्ह्यात देशातील पहिल्या बल्क ड्रग पार्कच्या पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करत होते. मोदी यावेळी असेही म्हणाले की, शहरी नक्षलवादी नवीन रूपात राज्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला पोशाख बदलला आहे. ते आपल्या भोळ्या आणि उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहेत.

'गुजरात अशा लोकांना उद्ध्वस्त करून टाकेल'

पंतप्रधान मोदी आज सभेत म्हणाले, "शहरी नक्षलवादी राज्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी धडपड करत आहेत. त्याचे विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही त्यांना आमची तरुण पिढी नासवू देणार नाही. आपण आपल्या मुलांना 'शहरी नक्षलवाद्यां'पासून सावध केले पाहिजे. या लोकांनी (शहरी नक्षलवाद्यांनी) देश उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. ते परकीय शक्तींचे एजंट बनून काम करत आहेत. पण मला विश्वास आहे की त्यांच्यापुढे गुजरात झुकणार नाही, उलट गुजरातची जनता त्यांचाच नाश करेल आणि त्यांचे मनसुबे उधळून लावेल."

गुजरातमध्ये सुरू आहे AAP ची मोर्चेबांधणी

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशासित राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी सरदार सरोवर धरण प्रकल्प रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अशी आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जनतेला करून दिली. शहरी नक्षलवादी आणि राजकीय पाठबळ असलेल्या विकासविरोधी घटकांनी गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचे बांधकाम रोखले होते. अनेक वर्षे मोहीम राबवून पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे सांगून त्यांनी त्याचे बांधकाम थांबवले, असा आरोपही पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात केला होता.

नक्षलवादावर काय म्हणाले PM मोदी?

"मला माझ्या आदिवासी बांधवांना विशेष सांगितले पाहिजे की, नक्षलवाद हा (पश्चिम) बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तसेच ओडिशा, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात प्रयत्नशील आहे. हे नक्षलवादी आमच्या आदिवासी तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. अशा वेळी राज्यातील आदिवासी लोकांनी माझे म्हणणे ऐकून माझ्यावर विश्वास ठेवला आहे, असे मी समाधानाने सांगू शकतो," असे पंतप्रधान मोदी विश्वासाने म्हणाले.

Web Title: Pm Modi termed Arvind Kejriwal led AAP Urban Naxal who are trying to destroy youth of Gujarat in Elections 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.