...जेव्हा मोदींनी पकडली केजरीवालांची चलाखी; हात जोडून मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 02:57 PM2021-04-23T14:57:58+5:302021-04-23T14:58:34+5:30

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक; मोदींनी काढली केजरीवालांची खरडपट्टी

Pm Modi Took Class After Leaking Talk Of Meeting Delhi CM Arvind Kejriwal Apologized With Folded Hands | ...जेव्हा मोदींनी पकडली केजरीवालांची चलाखी; हात जोडून मागावी लागली माफी

...जेव्हा मोदींनी पकडली केजरीवालांची चलाखी; हात जोडून मागावी लागली माफी

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा शब्दांत मोदींनी केजरीवालांना सुनावलं. यानंतर केजरीवाल बांभावून गेले. त्यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागितली.




दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. मला दररोज यासाठी फोन येतात. मी काय करावं? मी कोणाला फोन करावा?, असे प्रश्न केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित केले. विशेष म्हणजे केजरीवालांकडून या बैठकीचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. याबद्दल मोदींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'तुमची कृती आपल्या परंपरेच्या, प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं प्रोटोकॉलला धरून नाही,' असं मोदींनी केजरीवालांना सुनावलं.




तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. अशा स्वरुपाच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं योग्य नाही. आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, असं मोदींनी म्हटलं. यानंतर केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचं म्हटलं. 'पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,' असं म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडले.




...जेव्हा मोदींनी लक्षात आली केजरीवालांची चलाखी
अरविंद केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील त्यांचा संवाद गुपचूपपणे रेकॉर्ड करत होते. ही बाब पंतप्रधान मोदींच्या लक्षात आली. त्यांनी याबद्दल केजरीवालांना कठोर शब्दांत सुनावलं. त्यावेळी केजरीवालांना काहीसा धक्काच बसला. केजरीवालांनी पंतप्रधानांसोबतचा संवाद केवळ रेकॉर्ड केला नाही. तर तो लीकदेखील केला. यावरून आता भारतीय जनता पक्षानं केजरीवालांना लक्ष्य केलं आहे.

Read in English

Web Title: Pm Modi Took Class After Leaking Talk Of Meeting Delhi CM Arvind Kejriwal Apologized With Folded Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.