फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:53 AM2021-03-01T10:53:49+5:302021-03-01T10:56:22+5:30
(PM Narendra Modi And Corona Vaccine : पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,96,731 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,157 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजपासून देशामध्ये लसीकरणाच्या आणखी एका टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली.
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला. मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा
पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.
Where is the mask....?? pic.twitter.com/Os95OJ8Sl0
— V (@alwaysvishnus) March 1, 2021
Well deserved!
— Paresh Khanna (@PareshKhanna) March 1, 2021
In your safety is the safety of our Nation!
Jug Jug jiyein aap Pradhan sevak @narendramodi ji 🙏 pic.twitter.com/JI4kUUxGMs
फ़ोटो खिंचवाने के लिए मास्क निकालना जरूरी है?? वाकई हमारे देश का प्रधानमंत्री कैमराजीवी है😜😜💉💉
— Manzar Siddiqui 🇮🇳 (@ManzarKne) March 1, 2021
Without mask because it was photo shoot opportunity
— Sumedh Bhagwat (@sumedhbhagwat) March 1, 2021
Biden took vaccine wearing a mask
Modiji kh rhe hai ab vaccine lgg gyi ab mask kya krna hai 🔥👏👏👏👏👏👏👏
— Ishpreet Singh (@Ishpree15095984) March 1, 2021
सर जी वैक्सीन ही लगवा रहे हो या खाली फोटो सूट कर रहे हैं।
— Shivanand Yadav (@Shivana77636436) March 1, 2021
PM Modi takes vaccine in AIIMS Hospital
— Kapil Gopaliya (@GopaliyaKapil) March 1, 2021
Without mask !!!
Mask please. Two doses and few days required for vaccine to act!!
— Salil (@myopsnoturs) March 1, 2021