PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:47 PM2021-09-14T12:47:15+5:302021-09-14T12:48:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या.

pm modi to visit america next week for quad leaders summit | PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला! व्हाइट हाऊसमध्ये घेणार बायडेन यांची भेट

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर या दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी ‘क्वाड’ देशांच्या परिषदेत सहभागी होणार असून, पहिल्यांदाच दोन्ही देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. (pm modi to visit america next week for quad leaders summit)

Vi साठी ‘या’ बँकांचे मोदी सरकारला साकडे; पुढाकार घेत केली महत्त्वाची मागणी

क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुढील आठवड्यात क्वाड परिषदेचे आयोजन केले असून, केंद्र सरकारने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे. २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही परिषद होणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित असतील.

भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पटेल समाजाची नाराजी गुजरातमध्ये दूर होईल? 

सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर चर्चा 

या बैठकीत नेते १२ मार्चला झालेल्या पहिल्या व्हर्च्यूअल परिषदेनंतर झालेली प्रगती तसेच सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर चर्चा करतील. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून यावेळी मार्च महिन्यात लसीसंबंधी करण्यात आलेल्या घोषणेसंबंधी यावेळी आढावा घेण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याशिवाय, भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. तसेच या बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अमेरिकेत सत्तांतर होऊन जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. पंतप्रधान मोदी यांची आणि जो बायडन यांची पहिली वैयक्तिक भेट ठरणार आहे. अमेरिकेतील सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करत अफगाणिस्तानवर ताबा मिळवत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आणि चिंताजनक रूप धारण करत असताना  मोदी आणि बायडेन यांची ही भेट महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी चीनवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: pm modi to visit america next week for quad leaders summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.