पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 02:55 PM2018-11-07T14:55:55+5:302018-11-07T15:00:12+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उत्तराखंडमधील हर्षिल येथील जवानांच्या कॅम्पमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली.
नरेंद्र मोदी 2014 पासून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहे. यंदा उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच, त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई खाऊ घातली. यावेळी 'तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात, अशी भावना नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली.
#WATCH: PM Narendra Modi and Jawans of the Indian Armed Forces at Harsil chant 'Bharat Mata ki Jai' and 'Vande Mataram'. #Uttarakhandpic.twitter.com/cwNN6TqE3m
— ANI (@ANI) November 7, 2018
जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर नरेंद्र मोदी केदारनाथला गेले. हेलिपॅडपासून जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात पूजाअर्चना केली. शिवाय, येथे होणाऱ्या विकासकामांची पाहणीही केली. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. यावेळेस मंदिरात त्यांनी जलाभिषेकही केला. मंदिराला प्रदक्षिणाही घातली.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi celebrated #Diwali with Jawans of the Indian Armed Forces at Harsil today. pic.twitter.com/0aPgItJW1F
— ANI (@ANI) November 7, 2018
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi was greeted by the locals in Harsil earlier today, where he celebrated #Diwali with Jawans of the Indian Armed Forces. pic.twitter.com/eOLx6Hugip
— ANI (@ANI) November 7, 2018
As an RSS member,I got opportunity to live among Army men. At that time I heard a lot about One Rank One Pension.Many govts came&left.Since I was connected to you I understood your emotions. So,after becoming PM it was my responsibility to fulfill your dreams of OROP:PM in Harsil pic.twitter.com/SjcB59EOLn
— ANI (@ANI) November 7, 2018
On #Diwali, PM Modi visited Kedarnath today. He offered prayers at Kedarnath Temple. He extensively walked around the temple complex, where reconstruction works are in progress. He was briefed by senior officials about the progress of the work. #Uttarakhandpic.twitter.com/ZL38dK6PIZ
— ANI (@ANI) November 7, 2018