मोदी टीव्हीवर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी १००% टक्के खरी ठरली; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:54 AM2021-05-22T09:54:30+5:302021-05-22T09:55:11+5:30
खासदारानं महिनाभरापूर्वी केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांनी केलेला भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं सिंह यांनी गेल्याच महिन्यात म्हटलं होतं. आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली.
मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासा
आम आदमी पक्षानं एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचं म्हटलं आहे. संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपनं पत्रकात नमूद केलं आहे. १७ एप्रिल रोजी संजय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी 'अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,' असं म्हटलं होतं.
जो 17 अप्रैल को बोला था
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw
याच मुलाखतीचा काही भाग शेअर करत संजय सिंह यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. 'जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजी खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवीय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,' अशा शब्दांत संजय सिंह यांनी शरसंधान साधलं आहे.