पीएम मोदी ९ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार! तुमच्या शहराच नाव यादीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 07:16 PM2023-09-21T19:16:38+5:302023-09-21T19:17:10+5:30
देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक रेल्वेगाडी असणारी वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसातच पीएम मोदी ९ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
गेल्या काही महिन्यात देशाला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. शिर्डी, सोलापूरसह गोव्यासाठीही काही महिन्यापूर्वी एक्सप्रेस सुरू झाली, आता कोल्हापूरसह अन्य काही शहरांनीही या गाड्यांची मागणी केली आहे. पीएम मोदी २४ रविवारी २४ सप्टेंबर रोजी देशाला ९ नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट देणार आहेत. यामध्ये देशातील अनेक राज्ये आणि शहरांचा समावेश आहे. याद्वारे अनेक मार्गावरील प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल.
दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद
देशाला आणखी ९ सेमी-हाय स्पीड ट्रेनच्या रूपाने ९ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची भेट मिळेल. या गाड्या सुरू झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक गाड्यांचा लाभ मिळणार आहे.
'या' राज्यांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेस
राजस्थान, गुजरात, तेलंगणा, ओडिशा, केरळ तसेच पश्चिम बंगालमधील हावडा आणि तामिळनाडूमधील चेन्नई येथे प्रत्येकी २ ट्रेन जाणार आहेत. भारतीय रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही पोस्टद्वारे काही ट्रेन्सची माहिती दिली आहे.
या मार्गावरुन धावणार
या ९ मार्गांवर वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. यात रांची-हावडा, पाटणा-हावडा, विजयवाडा-चेन्नई, तिरुनेलवेली-चेन्नई, राउरकेला-पुरी, उदयपूर-जयपूर, कासारगोड-तिरुवनंतपुरम जामनगर-अहमदाबाद आणि हैदराबाद-बेंगळुरू.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२३ मध्ये वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, फेब्रुवारी मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. वंदे भारत गाड्या १०० टक्के भारतीय तंत्रज्ञानाने बनवल्या आहेत, ज्या शताब्दी, राजधानी सारख्या गाड्या बदलण्यासाठी तयार केल्या जात आहेत. ही ट्रेन चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे.