पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेपाठोपाठ 'या' देशात जाणार, भारताला होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 04:03 PM2023-06-18T16:03:11+5:302023-06-18T16:04:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिला इजिप्त दौरा होणार आहे. २४ आणि २५ जून रोजी होणार्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा दौरा असेल.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत, तिथे त्यांना व्हाईट हाऊसचे पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि पीएम मोदी यांच्यातील या भेटीत संरक्षण, आशियातील चीनच्या वाढत्या वर्चस्वावर नियंत्रण आणि इतर अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी यासह अनेक परिणाम होतील, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर या भेटीचा संबंध अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांशी जोडला जात आहे, तिथे भारतीय वंशाची मोठी लोकसंख्या आहे. मात्र, अमेरिकेनंतर लगेचच पीएम मोदी इजिप्तला भेट देणार आहेत, या दौऱ्याचीही सध्या जोरदार चर्चा आहे.
'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेनंतर लगेचच इजिप्तला रवाना होणार असून, ते २४ आणि २५ तारखेला इजिप्तमध्ये असतील. इजिप्तचा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या इजिप्त दौऱ्याला मंजुरी दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला इजिप्त दौरा आहे, जेथे ते २४ आणि २५ जून रोजी कैरोमध्ये असतील. इजिप्तने ब्रिक्स देशांचे सदस्यत्व घेतले आहे. या घोषणेनंतरच हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
या दौऱ्याचा भारताला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम आशियाई देश ब्रिक्स देशांशी व्यापार करतात. यादरम्यान व्यापारावरील डॉलरचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डॉलर व्यापाराला पर्याय शोधला जात आहे, ज्यामध्ये इतर चलनांना मान्यता दिली जात आहे. सध्या भारत आणि इजिप्तचा व्यापार सुमारे ७ अब्ज डॉलर आहे. ज्या प्रकारे भारतात आयआयटी सारख्या उच्च शैक्षणिक संस्था आहेत, इजिप्तलाही त्यांच्या देशात महाविद्यालये उघडायची आहेत. पश्चिम आशिया आणि आफ्रिकन देशांच्या राजकारणात इजिप्त अधिक मजबूत स्थितीत असल्याचे दिसते, त्यामुळे इजिप्तला भेट दिल्याने भारतासाठीही इतर अनेक मार्ग खुले होऊ शकतात.