Navratri 2021: “नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो”; PM मोदींच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 09:50 AM2021-10-07T09:50:39+5:302021-10-07T09:51:22+5:30
PM Narendra Modi Navratri 2021 wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली: देशभरात नवरात्रौत्सवाला (Navratri 2021) उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मंदिरे खुली झाल्याने भाविकांमध्ये आनंदी वातावरण असून, सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ सुरू झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब मुंबादेवीचे दर्शन घेतले असून, दुसरीकडे देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शारदीय नवरात्राला म्हणजेच दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव ९ दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे. (pm modi gives navratri utsav 2021 wishes)
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत. नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एक ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी देवी शैलपुत्रीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही देवी शैलपुत्रीला प्रार्थना करतो. ही स्तुती समर्पित करतो, असे म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स ऋषिकेश येथून देशातील ३५ ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केअर फंडातून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बांधण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात गणेशोत्सवापाठोपाठ आता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवासाठी सरकारने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधक नियमांना विरोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे सरकारने घातलेल्या गरबा बंदीलाही मंडळांनी विरोध दर्शवला आहे.
Navratri greetings to everyone. The coming days are about devoting ourselves to the worship of Jagat Janani Maa.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2021
May Navratri be the bringer of strength, good health and prosperity in everyone’s lives. pic.twitter.com/f42HyGnUYM