PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 02:52 PM2024-09-29T14:52:46+5:302024-09-29T14:53:14+5:30
गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढली आहे. सरकार या दिशेने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे.
PM Modi Launched EV Charging Stations : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच, देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकारही सातत्याने पावले उचलत आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देण्यासोबतच, चार्जिंगची सुविधा वाढवण्यार भर देत आहे. याच दिशेने आज सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान मोदींची मोठी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 29 सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यासोबतच पंतप्रधानांनी हरित ऊर्जेच्या क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स आणि एलएनजी स्टेशन्सचीही सुरुवात केली. केंद्र सरकारने पुण्यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत.
Speaking at launch of various projects in Maharashtra. These will give a boost to urban development and significantly add to 'Ease of Living' for the people. https://t.co/0hXLSIJTGN
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 500 नवीन चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ केला. तसेच, सरकारने 2025 पर्यंत 10 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासोबतच पंतप्रधानांनी देशात 20 लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) स्टेशन सुरू केले आहेत, त्यापैकी तीन महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहेत.
जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रासह देशाचं नुकसान; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
पुण्याला अनेक योजना मिळाल्या
पुण्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे जाळे विस्तारले आहे. या प्रकल्पांतर्गत 9 नवीन स्थानकांचा विस्तार करण्यात आला आहे. यासोबतच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदींनी केले.