अधिवेशनापूर्वी PM मोदींची NITI आयोग अन् अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 02:46 PM2024-07-11T14:46:55+5:302024-07-11T14:47:31+5:30
PM Modi Meeting with NITI Aayog: येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील.
PM Modi Meeting with NITI Aayog : येत्या 22 जुलै रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) संसदेत मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. तत्पुर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी NITI आयोग आणि देशातील दिग्गज अर्थतज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीत पंतप्रधान मोदी देशातील काही दिग्गज अर्थतज्ज्ञांशी चर्चा करतील. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी त्यांच्याकडून सूचना घेणार आहेत. या बैठकीत अर्थतज्ज्ञांव्यतिरिक्त विविध क्षेत्रातील तज्ज्ञदेखील सहभागी होत आहेत. यामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यांचाही समावेश आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi holds a meeting with economists ahead of the Union budget which will be presented on July 23; Union Finance Minister Nirmala Sitharaman also present
— ANI (@ANI) July 11, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/hlgxNfDJ9P
विकसित भारताच्या रोड मॅपवर चर्चा होऊ शकते
दरम्यान, केंद्र सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थसंकल्पाद्वारे विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करण्याची सरकारची इच्छा आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी विकसित भारताच्या रोडमॅपवर तज्ज्ञांच्या सूचनाही घेणार आहेत. केंद्र सरकारचे लक्ष सर्वाधिक गरीब, मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांवर आहे. गरीब वर्गाच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचीही सरकारची योजना आहे.
गेल्या महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अर्थसंकल्पाविषयी सांगितले होते की, 'भविष्यातला भारत डोळ्यासमोर ठेवून सरकार अर्थसंकल्प सादर करेल. यामध्ये प्रमुख आर्थिक आणि सामाजिक समस्यांसोबतच अनेक ऐतिहासिक टप्पेही पाहायला मिळतील.