भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 08:20 PM2023-09-13T20:20:01+5:302023-09-13T20:20:37+5:30
G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यालयात पोहोचले, यावेळी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
नवी दिल्ली: G20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पहिल्यांदाच दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदींचे जंगी स्वाग केले. त्यांच्यासोबत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पीएम मोदींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at BJP headquarters in Delhi, welcomed by top leaders of the party pic.twitter.com/AGVfIYUgxX
— ANI (@ANI) September 13, 2023
9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिखर परिषदेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, सौदी अरेबिया, अर्जेंटिना यासह जगातील सर्व शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. नवी दिल्ली घोषणेवर G-20 मध्ये एकमत झाले. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. G-20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#WATCH | Top BJP leaders welcome PM Modi on his arrival at the party headquarters in Delhi
— ANI (@ANI) September 13, 2023
The PM is visiting the BJP headquarters for the first time after the completion of the G20 summit pic.twitter.com/OwntmkqKDE
भाजप मुख्यालयात बैठक
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि येत्या काही महिन्यांत अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात पोहोचले आहेत. बैठकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी झालेल्या बैटकीत काही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.