'मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक', 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 11:25 AM2023-08-27T11:25:34+5:302023-08-27T11:27:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा आज १०४ वा भाग आहे.

pm narendra address in modi mann ki baat 104th episode 27 august programme chandrayaan 3 | 'मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक', 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

'मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक', 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. मन की बात कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आज २७ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा १०४ वा भाग आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी चंद्रयानच्या यशाचा उल्लेख करत मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक असल्याचे सांगितले.

नरेंद्र मोदी आज B20 शिखर परिषदेला संबोधित करणार; आर्थिक विकासाला चालना देण्यावर लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, चंद्रयानचे यश मोठे आहे, याची सर्वत्र चर्चा होत आहे. चंद्रयानाच्या यशाने यशाचा सूर्य चंद्रावरही उगवल्याचे दाखवून दिले आहे. हे अभियान स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण आहे, या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, असंही मोदी म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले, भारताच्या मुली आता अनंत समजल्या जाणाऱ्या अवकाशालाही आव्हान देत आहेत. जेव्हा एखाद्या देशाच्या मुली एवढ्या महत्त्वाकांक्षी बनतात, तेव्हा त्या देशाला विकसित होण्यापासून कोण रोखणार? पुढील महिन्यात होणाऱ्या G-20 परिषदेसाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

सप्टेंबर महिना भारताच्या क्षमतेचा साक्षीदार असणारा आहे, पुढील महिन्यात होणाऱ्या G-20 लीडर्स समिटसाठी भारत पूर्णपणे तयार आहे. G-20 परिषदेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल, असंही मोदी म्हणाले. 

पीएम मोदी म्हणाले की, त्यांच्या अध्यक्षतेच्या काळात भारताने G-20 ला अधिक समावेशक मंच बनवले आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ G-20 मध्ये सामील झाला आणि आफ्रिकेतील लोकांचा आवाज जगाच्या या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचला.

Web Title: pm narendra address in modi mann ki baat 104th episode 27 august programme chandrayaan 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.