धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By देवेश फडके | Published: February 22, 2021 01:27 PM2021-02-22T13:27:16+5:302021-02-22T13:31:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे.

pm narendra modi address at assam during inaugurate many projects | धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next
ठळक मुद्देविकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे - पंतप्रधानरोजगाराच्या संधी वाढणार - पंतप्रधानसबका साथ, सबका विकास, सबका विश्वास - पंतप्रधान

दिसपूर :पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे. (pm narendra modi address at assam during inaugurate many projects)

आसाममध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपले सामर्थ्य आणि क्षमता या दोन्हींमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. धोरणे चांगली असतील, ती राबवण्यासाठी वृत्ती चांगली असेल, तर परिस्थितीही बदलते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

विकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे

आसामवासीयांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी काम केले जात आहे. विकासाचे डबल इंजिन मजबूत करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या जनतेला केले. दशकांपासून राज्य करणाऱ्यांनी दिसपूरला दिल्लीपासून नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे आसामचे मोठे नुकसान झाले. मात्र, दिल्ली आता दिसपूरसाठी दूर राहिलेली नाही. आसामच्या जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

रोजगाराच्या संधी वाढणार

आसाममध्ये लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आसाममधील जनतेला मूलभूत सुविधा मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. यामुळे आसामसह देशाच्या विकासाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. 

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या मंत्रावरच केंद्रातील सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने भेदभाव दूर करण्यावर भर दिला आहे. देशवासीयांना वीज, गॅस, इंटरनेट देण्याचे काम केंद्र सरकारने प्रभावीपणे केले आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत या सोयी, सुविधांमध्ये अनेक पटींमध्ये वाढ झाली आहे. गरिबांचा जीवनस्तर सुधारावा हेच आमचे ध्येय आहे आणि नवीन सुधारणांमुळे फायदा मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

Web Title: pm narendra modi address at assam during inaugurate many projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.