MannKiBaat:देशातील तरुणांमध्ये अराजकता, जातीवाद, घराणेशाहीबद्दल चीड: पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:10 PM2019-12-29T12:10:10+5:302019-12-29T12:10:51+5:30
देशातील तरुण 'भारत राष्ट्र निर्मिती'त महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरच्या ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. देशातील तरुण-तरुणींमध्ये अराजकता, घराणेशाही आणि जातीयवाद याबद्दल चीड आहे. आपल्या देशातील तरुणांना योग्य व्यवस्थाच आवडते असे यावेळी मोदी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आजची पीढी खूप वेगवान आहे. तर आजचा तरुण काही नवीन आणि वेगळ्या गोष्टी करण्याच्या विचारत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच देशातील तरुण 'भारत राष्ट्र निर्मिती'त महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मोदी म्हणाले.
यावेळी स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणायचे की, तारुण्याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही. तारुण्य जीवनातला सर्वात मौल्यवान कालखंड असतो. या काळात तुम्ही तुमचे आयुष्य कसे जगता त्यावरच तुमचा भविष्यकाळ अवलंबून असतो. असेही मोदी म्हणाले.
PM Modi in #MannKiBaat: I believe, the coming decade for India will not only be for development of youth but also development of nation driven by capabilities of youth. https://t.co/mOxo52uun7
— ANI (@ANI) December 29, 2019