देशातील प्रचार संपल्यावर मोदी म्हणाले, 'फिर एक बार, पूर्ण बहुमताचं सरकार'!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:18 PM2019-05-17T17:18:01+5:302019-05-17T17:18:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले, मी मध्य प्रदेशात होतो, तिथूनच इकडे पोहोचलो. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आपली लोकशाही विविधतेनं भरलेली आहे. . जगाला प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आहेत. सरकार सक्षम असल्यानंच आयपीएल, रमझान आणि नवरात्रीसारख्या गोष्टी शांततापूर्ण वातावरणात झाल्या. ही आपल्या देशाची ताकद आहे. पूर्ण बहुमताचं सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुन्हा निवडून येईल, असं फार वर्षांनंतर होणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.
PM Narendra Modi at a press conference in Delhi: In last 2 elections, even IPL couldn't be held. When government is strong, IPL, Ramzaan, school exams and others take place peacefully pic.twitter.com/edn4zahDAU
— ANI (@ANI) May 17, 2019
2014मध्ये एकदा संधी मिळाली, आता 2019मध्ये पुन्हा एकदा संधी मिळत आहे. पाच वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशानं साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीतल्या प्रचारात मी पाच वर्षांच्या जनता जनार्दनानं दिलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहेत. जनता पहिल्यांहून अधिक आशीर्वाद आम्हाला देत आहे. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल आला होता. 17 मे रोजी मोठी घटना घडली.
PM Modi: Election results came on May 16, 2014. A huge casualty took place on May 17, 2014. Today is May 17. People in 'Satta bazaar' who used to bet for Congress to win in elections faced huge losses on May 17 pic.twitter.com/rYQ6IpCvoj
— ANI (@ANI) May 17, 2019
आज 17 मे आहे. गेल्या निवडणुकीत याच दिवशी मोदींच्या उपस्थितीनं सट्टाबाजाराला मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सट्टाबाजार बुडाला होता. त्यामुळे 17 मेपासूनही प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होती. मला आतापर्यंत एकही कार्यक्रम रद्द करावा लागलेला नाही, असंही मोदी म्हणाले आहेत.
PM Narendra Modi: It will happen after a long time in the country, our Government will come to power with absolute majority for second consecutive time. pic.twitter.com/Jr1biKJNGa
— ANI (@ANI) May 17, 2019