Digital Payment मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली; पंतप्रधानांनी व्यक्त केली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:59 PM2021-09-26T12:59:29+5:302021-09-26T13:07:24+5:30
PM Narendra Modi Mann Ki Baat : सध्या सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटी UPI द्वारे होत असल्याची पंतप्रधानांची माहिती.
डिजिटल पेमेंटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. ऑगस्ट महिन्यात ३५५ कोटी रूपयांची UPI द्वारे देवाणघेवाण करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यांनी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल व्यवहार UPI द्वारे केले जात आहेत, असंही ते म्हणाले.
"ऑगस्ट महिन्यात युपीआयद्वारे ३५५ कोटी रूपयांची देवाणघेवाण करण्यात आली. सरकारी ६ कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवहार हे युपीआयद्वारे होत आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेत पारदर्शकता आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. आजकाल एक विशेष ई-ऑक्शन सुरू आहे. हा लिलाव मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या वस्तूंचा केला जात आहे. यातून जो पैसा येणार आहे. त्याचा वापर नमामी गंगे या मोहिमेसाठी दिला जाणार असल्याचंही मोदी म्हणाले.
"जनधन खात्यांबाबत जी मोहीम सुरू करण्यात आली त्यामुळे गरीबांचे हक्काचे पैसे त्यांच्याच खात्यात जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारही कमी झाला. आज तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गावाखेड्यांमध्येही युपीआयद्वारे लोक पैशांची देवाणघेवाण करत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
Speaking on a wide range of topics in #MannKiBaat. Tune in. https://t.co/FNJDiv7Tvc
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2021
आज जागतिक नदी दिवस
सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील ३६५ दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली.